ग्रामपंचायत महाज बद्दल

ग्रामपंचायत महाज (पो. धसई, ता. मुरबाड, जि. ठाणे) ही मुरबाड तालुक्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण व सुस्थित ग्रामपंचायत आहे. महाज गावाची ग्रामपंचायत सन १९६५ साली स्थापन झाली असून ग्रामपंचायतीची स्वतःची सुसज्ज व प्रशस्त इमारत आहे. गावात एकूण १५५ घरे असून सुमारे ५९६ लोकसंख्या वास्तव्यास आहे. गावाचा साक्षरतेचा दर ७६.९२% असून गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ १९९.३८ हेक्टर आहे. गावातील मुख्य व्यवसाय शेती हा आहे.

महाज गावात इयत्ता ८ वी पर्यंत जिल्हा परिषद केंद्र शाळा असून ही शाळा आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. शाळेमध्ये डिजिटल शिक्षण व्यवस्था, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा युनिट, खेळाचे मैदान व संरक्षण भिंत अशा सुविधा उपलब्ध आहेत.

🏛️ प्रशासकीय रचना

ग्रामपंचायत महाज ही ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत येणारी स्थानिक स्वराज्य संस्था असून ग्रामविकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व सामाजिक कल्याणाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविते.

पदाधिकारी व प्रमुख व्यक्ती

सरपंच:
श्री. यशवंत भिका पारधी
मो. ९२७१९९७७५९

उपसरपंच:
श्री. दिगंबर शंकर सुरोशे
मो. ९७६४९१८७७७

ग्रामपंचायत अधिकारी:
श्री. जीवन रामजी पोचट
मो. ९०२८६७६५१०

ग्रामपंचायत पत्ता व संपर्क माहिती

ग्रामपंचायत महाज
पो. धसई, ता. मुरबाड,
जि. ठाणे, महाराष्ट्र

📧 ई-मेल: murbadvpmahaj02@gmail.com

ग्रामपंचायत सदस्यांची माहिती

ग्रामपंचायत महाजमध्ये एकूण ७ सदस्य कार्यरत आहेत.
सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे —

नीलकंठ महादू पारधी,
भरती वसंत सुरोशे,
रेश्मा रघुनाथ सुरोशे,
वनिता नीलकंठ पारधी.

ग्रामपंचायत आढावा व सुविधा

ग्रामपंचायत महाज हद्दीत खालील सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत —

ग्रामपंचायत भवन, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्र, पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, इंटरनेट सुविधा, सीसीटीव्ही व्यवस्था, डिजिटल सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र), व्यायामशाळा, तलाव / गाव तलाव, स्मशानभूमी, समाजमंदिर इत्यादी सर्व सुविधा सुस्थितीत व कार्यरत आहेत.

शैक्षणिक संस्था

जिल्हा परिषद शाळा महाज
UDISE क्रमांक: 27210905801
मुख्याध्यापक: श्री. संजय गणपत पेंढारे
मो. ९८५०८९२९९९

अंगणवाडी

अंगणवाडी केंद्र महाज – इमारत सुस्थितीत असून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत.

योजना व विकास कामे

ग्रामपंचायत महाज अंतर्गत खालील महत्त्वाच्या योजना व विकासकामे राबविण्यात आली आहेत —

  • जलजीवन मिशन – ग्रामीण पाणीपुरवठा योजना (₹ १.१७ कोटी)

  • जनसुविधा योजना – रस्ता पेव्हर ब्लॉक (₹ ५ लाख)

याशिवाय जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, महिला बचतगट / उद्योजकता योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, मोदी आवास योजना इत्यादी योजना कार्यान्वित आहेत.

ग्रामपंचायतीचा वार्षिक निधी सुमारे ₹ २,२८,०००/- असून तो प्रशासकीय खर्च, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, स्वच्छता, पाणीपुरवठा, सार्वजनिक दिवाबत्ती, दिव्यांग, महिला व बालकल्याण, रस्ते, कृषी, गटारे, स्मशानभूमी व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरण्यात येतो.

धार्मिक व सांस्कृतिक जीवन

गावात साई मंदिर, गावदेवी मंदिर, गणेश मंदिर, भवानी माता मंदिर, हनुमान मंदिर व शिव मंदिर ही प्रमुख धार्मिक स्थळे आहेत.
गणेशोत्सव, दिवाळी, दसरा, होळी, पोळा व रक्षाबंधन हे सण गावात मोठ्या आनंदाने साजरे केले जातात.

उपजीविका, कौशल्य व महिला सक्षमीकरण

गावात लाकडी फर्निचर काम, टोपल्या विणकाम, लोहारकाम यांसारखे पारंपरिक व्यवसाय केले जातात.
महिलांसाठी शिवणकाम व ब्युटी पार्लर प्रशिक्षण देण्यात आले आहे.

ग्रामपंचायत महाज अंतर्गत ११ बचत गट व १ ग्रामसंघ कार्यरत असून त्यापैकी ८ बचत गटांना बँक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

स्वच्छता व पर्यावरण

गावात आठवड्यातून एक दिवस स्वच्छता मोहीम राबविली जाते तसेच वृक्षारोपण करण्यात आले आहे.
प्लास्टिकमुक्त ग्रामसभा ठराव घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाते. प्लास्टिक कचरा वेगळा करून सेग्रिगेशन शेड मध्ये जमा केला जातो.

पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आधारित असून शाळा व अंगणवाडीत सोलर युनिट बसविण्यात आले आहेत.

नागरिक सेवा

ग्रामपंचायत महाजमार्फत खालील सेवा दिल्या जातात —

जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेचा दाखला (निःशुल्क), हयातीचा दाखला (निःशुल्क), ग्रामपंचायत येणे नसल्याचा दाखला, नमुना नं. ८ उतारा, जन्म/मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र, समाजकल्याण, कृषी, महिला व बालकल्याण, शिक्षण, दिव्यांग कल्याण योजनांचे अर्ज, मनरेगा नोंदणी, घरकुल अर्ज, नळजोडणी अर्ज, ऑनलाइन तक्रार व नागरिक फीडबॅक फॉर्म.

पुरस्कार व सन्मान

  • संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार

  • तंटामुक्ती गाव पुरस्कार

योजना व प्रमुख कार्ये

कामगिरी व विकास उपक्रम

मुरबाड पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे

दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे

मुरबाड पंचायत समितीचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे.

03

Super power Administration

Digitalization of all Gram Panchayat services

Health & Education

Improved education and healthcare access in rural areas

Entrepreneurship

Women entrepreneurship and youth skill development

Together, we aim to make every village model of cleanliness, digital governance, and sustainable development

Murbad Panchayat Samiti